HDFC Home Loan | पगारदारांनो! गृहकर्ज घेताना हा फॉर्म्युलाबघा, मिळेल फायदाच फायदा; EMI चे राहणार नाही टेन्शन

घर घेणं तेही स्वतःच हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. महानगरांमध्ये लोक नोकरीला लागताच आपल्या अनेक इच्छांपैकी एक म्हणज घर किंवा फ्लॅट खरेदीची योजना बनवू लागतात. आपल्या हक्काचं घर घेण्यासाठी पैसे जमा करणे त्याचे एक ध्येय बनते आणि सोबतच घरांच्या किंमतीही शोधू लागतो. आजच्या महागाईच्या काळात घर किंवा फ्लॅटच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की आपल्या संपूर्ण बचतीतूनही मालमत्ता खरेदी करणे सोपे नाही. म्हणूनच लोक गृहकर्ज घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करतात, परंतु गृहकर्ज दीर्घमुदतीचे कर्ज असते त्यामुळे होम लोन घेणं जितकं सोपं आहे तितकं ईएमआय भरणं सोपं नाही.

ईएमआय भरताना अनेकदा परिस्थिती बिकट होते. बहुतेक लोक बँकेकडून कर्ज घेऊन महागडे घर खरेदी करतात, पण दरमहिना ईएमआय भरणे कठीण होऊन बसते आणि ईएमआय भरतानाही घराचे बजेटही बिघडते. तुम्हीपण कर्ज घेतलं असेल किंवा घ्यायचा विचार करत असाल तर अशी परिस्थितीत तुमच्यावर ओढवू नये यासाठी एक खास फॉर्म्युला वापरला पाहिजे. तुमच्या उत्पन्नानुसार किती महागडे घर घ्यायचे आहे, बिल्डरला किती डाऊन पेमेंट करायचे, बँकेकडून किती आणि कोणत्या कालावधीसाठी कर्ज कर्ज घ्यायचे हे एका फॉर्म्युलानुसार ठरवू शकता.

घर खरेदी करताना हा फॉर्म्युला लागू करा

जेव्हापण तुम्ही घर किंवा फ्लॅट खरेदी कराल तेव्हा 3/20/30/40 चा विशेष फॉर्म्युला वापरा. या फॉर्म्युलानुसार हिशेब केला तर ना ईएमआयचा बोजा तुमच्यावर पडणार ना तुमच्या घराचे बजेट कोलमडणार. काय आहे हा फॉर्म्युला आणि कसा लागून करायचा समजून घेऊया

घर खरेदीवर 3/20/30/40 चे सूत्र

या सूत्रातील ३ म्हणजे तुम्ही जे घर खरेदी करत आहात त्याची किंमत त्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट नसावी. म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये असेल तर तुम्ही ३० लाखांपर्यंत घर किंवा फ्लॅट घेऊ शकता. तसेच वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपये असेल तर ४५ रुपयांपर्यंतची मालमत्ता खरेदीचा विचार करू शकता. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत तुमची खरेदी वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट असू नये.

यानुसार तुमच्या कर्जाचा ईएमआय ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. तुमची दरमहा कमाई ७५ हजार रुपये असेल तर तुमचा ईएमआय २२,५०० रुपयांपेक्षा जास्त नसावा तर यापेक्षा कमी असला तरी तुमच्यासाठी चांगलं आहे.
४० चा अर्थ

फ्लॅट खरेदी करताना डाउन पेमेंट करावे लागते. आणि या फॉर्म्युलानुसार ४० म्हणजे तुमचे डाउन पेमेंट. तुम्ही घरासाठी १० ते २० टक्के डाउन पेमेनेत करून उर्वरित कर्जाद्वारे पैशाचे नियोजन करू शकता. परंतु यामुळे गृहकर्जाची रक्कम वाढते परिणामी ईएमआयचा बोजाही वाढतो. म्हणजे किमान ४०% डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. आता समजा की तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये आहे आणि ३० लाखात फ्लॅट घेतला तर सुमारे १२ लाख डाउन पेमेंट करा. अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ १८ लाखांचे कर्ज घ्यावे लागेल ज्यामुळे तुमचे ईएमआयही जास्त नसेल आणि तुम्ही सहज कर्जाचे हप्ते फेडू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *